जळगाव: उडान बहुद्देशीय संस्था आयोजित दीपोत्सवात दिव्यांगांच्या हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर!*
जळगाव जिल्ह्यातील रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता चिमुकले श्रीराम मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला.