नागपूर शहर: हिट अँड रन!भंडारा नागपूर हायवे रोडवर कंटेनर ने दुचाकी चालकाला चिरडले ; वाहन सोडून पळून गेला चालक
30 डिसेंबरला दुपारच्या सुमारास महादेव पिंपळघरे वय 51 वर्ष हे त्यांच्या स्कुटीने पोलीस ठाणे पारडी हद्दीतील भंडारा नागपूर हायवे रोडने जात असताना, त्यांना मागून येणाऱ्या टाटा कंटेनर ने जोरदार धडक दिली व कंटेनर चालक घटनास्थळी वाहन सोडून पळून गेला. या अपघातात महादेव यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी हरीश निनावे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारडी येथे कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.