नागपूर शहर: इंधन दरवाढीचा नागपुरात भडका; युवक काँग्रेसचे 'झालमुरी' आंदोलन, दोन नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींविरोधात आज नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले. महाल परिसरातील ऐतिहासिक गांधी गेट येथे हे आंदोलन पार पडले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत युवक काँग्रेसच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.