तुमसर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध करत, तुमसर नगर परिषदेचे नगराध्यक्ष सागर विद्यामोहन गभने यांनी आज १५ जानेवारी रोज गुरुवारला दुपारी १२ वाजता शहरातील बावनकर चौक आणि बस स्थानक परिसराचा झंझावाती दौरा केला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष स्वच्छतेची बारकाईने पाहणी केली व संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छतेविषयी सूचना दिल्या. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी थेट भेट देत नागरिकांशी संवाद साधला.