कराड: दिवाळी पहिल्या आंघोळी पाठोपाठ मंगळवारी कराडच्या प्रशासकीय इमारतीसमोर दिवाळी फराळ आंदोलन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Karad, Satara | Oct 21, 2025 कापिल गावासह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या बोगस मतदानाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आंदोलनाच्या तेराव्या दिवशी मंगळवारी सकाळी अकरा वाजता दिवाळी फराळ आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. या दिवाळी फराळ आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते. गणेश पवार यांच्या आंदोलनाची व त्यांनी केलेल्या मागण्यांची दखल अद्याप प्रशासनाने न घेतल्याने पवार यांनी आता वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे.