नागपूर शहर: पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीला जन्मठेपेची शिक्षा; नागपूर जिल्हा न्यायालयाचा निकाल
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या आरोपी पतीला नागपूर जिल्हा न्यायालयाने जन्मठेप आणि ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ६ महिने सश्रम कारावास भोगावा लागेल.ही घटना २३ सप्टेंबर २०२३ रोजी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानेगाव येथे घडली होती. आरोपी मनोहर काशीनाथ मनगटे (वय ५६ वर्षे) याने आपली पत्नी सौ. रंजना मनोहर मनगटे (वय ५२ वर्षे) यांच्या चारित्र्यावर संशय घेतला.