रोहा: रोहा नगरपालिकेवर यावेळी भगवा फडकणार!
आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा विश्वास
Roha, Raigad | Oct 9, 2025 मुरूड नगरपरिषदेप्रमाणेच रोहा नगरपालिकेवर देखील यावेळी भगवा फडकणार! असे विधान आमदार महेंद्र दळवी यांनी रोह्यात पक्ष प्रवेश सोहळ्यात पत्रकारांसोबत बोलताना गुरुवारी रात्री साडे आठ वाजता केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले पाहायला मिळते.