नागपूर शहर: नागपूरच्या महाल परिसरात गोळीबार; शहरात खळबळ, बघा व्हायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज
नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि व्यापारी पेठांमुळे गजबजलेल्या महाल परिसरातील कोठी रोड भागात रविवारी मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून भांडण झाले आणि त्यानंतर अचानक गोळीबार करण्यात आला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात आज दिनांक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवरून सहा जण आले.