पनवेल: पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता अंतिम टप्प्यात
Panvel, Raigad | Jun 13, 2026 मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कला नवी 'लाइफलाइन' ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या २.७८२ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच या मागांवरील परचालनाची उलटी गिनती सुरू होणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे कल्याण मार्गावरील वाढता ताण कमी होण्यास मदत होणार असून, नवी मुंबई, रायगड आणि कर्जतदरम्यानच्या रेल्वे संपर्काला नवी गती मिळणार आहे.