शनिवार–रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांसाठी मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास अक्षरशः परीक्षा ठरला. शनिवारी सकाळपासूनच एक्सप्रेसवेच्या पुणे लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून, अनेक वाहनचालकांना तासनतास रस्त्यावर अडकून पडावे लागले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पर्यायी मार्ग म्हणून वापरला जाणारा जुना मुंबई–पुणे महामार्ग अर्थात बोरघाटही पूर्णपणे ठप्प झाला.