समुद्रपूर: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा:सर्व पक्षीय सदस्यांची व शेतकऱ्यांचे तहसिलदारान मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
समुद्रपूर: राज्यातील शेतकरी अतिवृष्टी पिकांचे नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतकरी गंभिर आर्थिक संकटात सापडले आहेत अश्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बच्चुभाऊ कडु ,ॲड वामनराव चटप, खासदार राजू शेट्टी, रासप नेते महादेव जानकर, शेतकरी नेते अजित नवले, आदी शेतकरी नेते यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक मुंबई घेणार आहे.या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या जिवन- मरणाशी काही तातळीच्या मागण्या विचाराधिन आहेत राज्यातिल सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करावा अशी मागणी केली.