आज दिनांक 30 डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा येथे घरावरील कवेलू फेकण्यास मनाई केल्याने लोखंडी पावड्याने मारून जखमी केल्याची घटना दिनांक 29 डिसेंबरला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान घडली आहे. याबाबतीत गोपाल लतीराम पवार यांनी 29 डिसेंबरला तीन वाजून दोन मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे