सुधागड: सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणाने गाठला तळ
यावर्षी उन्हाळा कडक असल्याने सर्वत्र उन्हाची छळ लागत आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रालाही बसला आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड पाटबंधारे विभाग अंतर्गत येत असलेल्या २८ धरण क्षेत्रात २५.४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर गेल्या वर्षी याच वेळी २८.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी २.९१ टक्के कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. अजूनही जवळपास एक महिना पावसाला शिल्लक असल्याने पाणी जपून वापरण्याची गरज आहे.