नागपूर शहर: गुन्हे शाखा युनिट-५ कडून वाहन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, तब्बल 14 दुचाकी जप्त : विनायक गोल्हे, पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 10 जून ला रात्री 8 वाजता दिलेल्या माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून १४ दुचाकी आणि घरफोडीचा मुद्देमाल असा एकूण १२,९१,००० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.याप्रकरणात आरोपी आकाश उर्फ भुऱ्या परिहार, विधीसंघर्ष बालक, शिवम जुनघरे आणि आयुश शेन्डे यांना अटक करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.