नागपूर शहर: सीताबर्डी परिसरात २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
21 मे ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिशप कॉटन स्कूलमागील दुसऱ्या गल्लीत एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. तरुणीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरण