नागपूर शहर: नागपूर महानगरपालिका: अतिक्रमण निर्मूलन मोहीम
नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे शहराच्या विविध भागांत आज धडक अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.सीताबर्डी मेन रोड, व्हेरायटी चौक, लोहपूल, हेरिटेज परिसर, मानस चौक ते मोदी नंबर १, २, ३ परिसरातील रस्ते व फुटपाथवरील अवैध ठेले आणि दुकाने हटवून ४ पुतळे जप्त केले.महाल चौक, बडकस चौक, गडकरीवाडा, कल्याणेश्वर मंदिर ते केळीबाग रोड परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन करण्यात आले.