आज दि.8 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी रात्री 8 वाजता बदनापूर ता. हलदोला येथील शेतकरी पुत्र माधव श्रीहरी म्हात्रे यांनी घाटी रुग्णालयात माहिती दिली आहे की त्यांचे वडील व काका आज बदनापूर तहसील कार्यालयात त्यांच्या रस्त्याच्या मागणीसाठी गेले असता द्यावी त्या ठिकाणी उपस्थित असलेले नायब तहसीलदार तायडे व बनवे यांनी आरे राई ची भाषा केली,त्यामुळे त्यांच्या काकाला हृदयविकाराचा झटका आला,तर काही दिवसांपूर्वी ते तहसील कार्यालयात गेले असता त्यांना 50 हजार रुपयाची मागणी सुद्धा केली आहे.