नागपूर शहर: नागपुरात भूखंड वादातून मामेभावावर चाकूने प्राणघातक हल्ला
27 एप्रिलला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार कपिलनगर हद्दीत भूखंडाचा ताबा मिळवण्याच्या वादातून विवेक अंबादे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मयूर बनकर याच्यावर शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी विवेकने मयूरच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले.मयूरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरार आहेत. भूमीच्या वादातून नात्यातील कटुता थेट रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.