एरंडोल: मेहुणबारे भगवा चौकातून रिक्षाद्वारे दोघांनी बकरी केली चोरी,पाठलाग केल्याने बकरी सोडून झाले फरार,मेहूणबारे पोलिसात गुन्हा
मेहणूबारे या गावात भगवा चौक आहे. या भगवा चौकात अशोक फकीरा गायकवाड हे राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी रिक्षामध्ये बकरी टाकून चोरी करून नेली. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी त्या रिक्षाचा पाठलाग केला. तेव्हा अज्ञातांनी सदर बकरी खडकी सिम गावाच्या फाट्याजवळ सोडून ते फरार झाले. तेव्हा याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे