औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी येथील तीर्थक्षेत्र सिद्धनाथ महादेव संस्थान येथे श्री दत्त जयंतीनिमित्त मंदिर संस्थांचे महंत परमपूज्य आत्मानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान गुरुवारी दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर दिनांक पाच डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी एक वाजल्यापासून भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तब्बल 70 क्विंटल बुंदी तर 100 क्विंटल खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला