नागपूर शहर: गिट्टीखदान हद्दीत वाहन चोरीचा गुन्हा उघड; अल्पवयीन ताब्यात
6 जून ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने एका वाहन चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन ५० हजार रुपये किमतीची चोरीची 'हिरो होंडा' दुचाकी जप्त केली आहे. आरोपी आणि जप्त दुचाकी पुढील कायदेशीर कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या या तत्परतेमुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.