हदगाव: माळोदे गल्ली येथे घरफोडी करून 74 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध हदगाव पोलिसांत गुन्हा नोंद
दि. 25 ऑक्टोबर ते दि. 28 ऑक्टोबर रोजी रात्री 9 च्या दरम्यान फिर्यादी विजय पांडे यांच्या राहत्या घरी माळोदे गल्ली येथे फिर्यादी घरी नसताना घराचे कुलूप कडी तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने व इतर साहित्य असे मिळून 74,500 रु. किमतीचे मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला होता, ह्या प्रकरणी हदगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि नंद हे करत आहेत.