पनवेल: कामोठ्यात वाहनचोरींचा सुळसुळाट; पाच दिवसांत चार दुचाकी गायब
Panvel, Raigad | Apr 19, 2026 कामोठे शहरात गेल्या काही दिवसांत वाहनचोरीच्या घटनांनी अक्षरशः डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे केवळ पाच दिवसांच्या कालावधीत तब्बल चार दुचाकी वाहनांची चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने कामोठे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अद्याप देखील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही.