नागपूर शहर: प्रताप नगरमध्ये आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश; ४ जण अटकेत : शुभांगी देशमुख पोलीस निरीक्षक युनिट दोन
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 13 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,क्राईम ब्रांच युनिट-२ ने प्रताप नगर परिसरातील आयटी पार्कजवळील 'सिद्धांत सक्षम अपार्टमेंट'मध्ये छापा टाकून एका मोठ्या ऑनलाइन आयपीएल सट्टेबाजी रॅकेटचा भांडाफोड केला आहे. चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावत असताना पोलिसांनी ४ आरोपींना रंगेहाथ पकडले. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.