उत्तर सोलापूर: युवक काँग्रेसच्या वतीने देशाचे अपयशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा
सोलापूर युवक कॉंग्रेसच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील सोलापूर महात्मा गांधी पुतळा समोर भारताचे अपयशी पंतप्रधान व बेरोजगारीचे जनक नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमीत्त आज दूपारी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांकडून चहाची केटलीतून चहा देताना व फलक घेऊन राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला.याबाबत अधिक माहिती शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली.