साकोली तालुक्यातील खैरलांजी येथे पाण्यासाठी टाकीवर चढून महिलांची 'विरूगीरी,टँकरद्वारे पाणी देण्याचे सरपंचाचे आश्वासन
पाण्यासाठी पाणीटंकीवर चढून महिलांची 'विरूगीरी साकोली तालुक्यातील खैरलांजी येथील प्रकार ; घटनास्थळी ग्रामस्थांनी केला टाकी बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप ; पोलीसांची समयसूचकता साकोली : दोन वर्षांपासून बांधून ठेवलेल्या पाणीपुरवठा टाकीत अद्यापही पाणी नाही. करीता काल ( सोम. ३० मार्च ) ला गटग्रामपंचायत खैरलांजीतील सुमारे ३५ ते ४० महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगीरी करीत आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती होताच साकोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर येथे ग्रामस्थांनी टाकी बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला व त्या प्रत्येक बांधकामांचे फ