रामटेक: कांद्री माईन्स चिंधाई मंदिर जवळ अज्ञात कंटेनरच्या धडकेत ढाब्याचा स्वयंपाकी जबर जखमी
Ramtek, Nagpur | Mar 18, 2026 बुधवार दिनांक 18 मार्चला सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री माईन्स परिसरातील चिंधाई माता मंदिर जवळ एका अज्ञात कंटेनरच्या धडकेत दुचाकी चालक एका ढाब्याचा स्वयंपाकी जबर जखमी झाला असून यात त्याचा डावा हात निकामी झाल्याचे दृश्य होते. या घटनेत बोर्डा फाट्यावरील शेर - ए - पंजाबचा स्वयंपाकी रंगनाथ मिश्रा वय 50 वर्ष हा जबर जख्मी झाला आहे.