नागपूर शहर: ऑनलाईन क्रिकेट सट्ट्या नादामुळे अकाउंटंटने केला दीड ते दोन कोटींचा अपहार; आरोपीला अटक: संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 28 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित हार्डवेअर दुकानाच्या अकाउंटंटने मालकाची तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याच्या नादामुळे या अकाउंटंटने हे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे