नागपूर शहर: नागपुरात हेलिपॅड असलेले 23 मजली प्रशस्त रुग्णालय, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते भूमिपूजन
शहरात लवकरच अत्याधुनिक सर्वसमावेशक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी रुग्णालय उभारण्यात येणार असून सर्व निदान व उपचार सुविधा एका छताखाली उपलब्ध असतील. सरसंग चालक मोहन भागवत यांच्या हस्ते आज या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले. नागपुरातील उत्तर अंबाझरी मार्गावर 23 मजली या इमारतीच्या छतावर हेलीपॅड असणार आहे. l