नागपूर शहर: नागपूर पोलिसांची कामगिरी: २२१ हरवलेले मोबाईल मालकांच्या स्वाधीन: नित्यानंद झा पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी सहा दिलेला सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,नागपूर शहर पोलीस दलाच्या झोन-५ ने तांत्रिक तपास करून तब्बल ४१ लाख ९८ हजार ५४ रुपये किमतीचे २२१ हरवलेले मोबाईल शोधून काढले आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पारडी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या खऱ्या मालकांना परत करण्यात आले. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी दिली आहे.