मानगाव: लोणेरेतील तरूणीच्या निघृण हत्याकांडातील आरोपीला अटक
Mangaon, Raigad | Apr 27, 2026 रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे घडलेल्या 22 वर्षीय युवतीच्या निघृण हत्याकांड प्रकरणातील आरोपीला अखेर पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर रायगड पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली आहे. अनिस मोहम्मदखान मालदार (वय 38, रा. लांजा जि. रत्नागिरी) असे या आरोपीचे नाव आहे. अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने या युवतीची का हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.