नागपूर शहर: नंदनवन घरफोडी प्रकरणाचा छडा: ४ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
23 जून ला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसांपूर्वी घडलेली घरफोडी गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चेतन मनोज बुराडे (वय या आरोपीला अटक केली आहे.युनिट-४ चे पथक पेट्रोलिंग करत असताना आरोपी चेतन बुराडे संशयास्पद स्थितीत मिळून आला. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४ लाख ४० हजार रुपये किमतीची ४४ ग्रॅम वजनाची पिवळ्या धातूची लगड मिळून आली. कसून चौकशी केली असता, त्याने १५ दिवसांपूर्वी श्रीनगर परिसरात घरफोडी केल्याची कबु