लातूर: मांजरा, रेणापूर व तावरजा धरणांची गेटे उघडली; नागरिकांनी घ्यावी खबरदारी
Latur, Latur | Oct 29, 2025 मांजरा, रेणापूर व तावरजा धरणांची गेटे उघडली; नागरिकांनी घ्यावी खबरदारी लातूर : मांजरा प्रकल्प धनेगाव, रेणापूर आणि तावरजा धरण क्षेत्रात वाढत्या पावसामुळे येणाऱ्या मोठ्या येव्याचा विचार करून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तिन्ही धरणांची गेटे उघडण्यात आली आहेत. प्रशासनाने नदीकाठावरील व पुरग्रस्त भागातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले .