अर्धापूर: येळेगाव येथे शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल
दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी चार ते सहा च्या दरम्यान येळेगाव ता. अर्धापुर जि. नांदेड येथे, यातील मयत परमेश्वर नारायण कपटे, वय 26 वर्षे, व्यवसाय शेती रा. येळेगाव ता. अर्धापुर, यांनी अतिवृष्टी व सततच्या नापीकीला कंटाळुन गळफास घेवून आत्महत्या केली. खबर देणार शिवाजी मारूती कपटे, वय 26 वर्षे, रा.येळेगाव ता. अर्घापुर, यांनी दिलेल्या खबरीवरुन अर्धापूर पोलीसअर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मूर्तीचा आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों काळे, हे करीत आहेत.