तेल्हारा: हिवरखेड येथे सात वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. एकाच घेतले पोलिसांनी ताब्यात.
Telhara, Akola | Dec 2, 2025 हिवरखेड येथे नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पोलीस बंदोबस्त मतदानाच्या ठिकाणी व्यस्त असण्याचा फायदा घेत एका व्यक्तीने सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दत्त भारती मंदिराजवळ ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संशयित व्यक्तीने मुलीला उचलून पुढील चौकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला,मात्र चौकात लोक उपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मुलीला तेथेच सोडून दिल.