श्रीगोंदा शहरातील पांढरकर मळा येथील लक्ष्मी आई मंदिराजवळील बंधाऱ्यात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह.. श्रीगोंदा शहरातील पांढरकर मळा परिसरात आज (दि. 7 जानेवारी) एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वस्तीजवळच असलेल्या लक्ष्मी आई मंदिराच्या खालील बाजूस असलेल्या बंधाऱ्यातील पाण्यात हा मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसला. पांढरकर मळा परिसरात नागरिक सकाळी वावरत असताना त्यांना बंधाऱ्याच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला.