नागपूर शहर: जुन्या वादातून प्राणघातक हल्ला; दोन आरोपी अटकेत :संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप मेंढे यांनी 9 जूनला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जूनच्या रात्री जुन्या वादातून अब्दुल हमीद नावाच्या व्यक्तीवर तीन जणांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी मोहम्मद शफीक आणि मोहम्मद अतीक यांना अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.