मेळघाट येथील देडतलाई रस्त्यावरील गोंडवाली येथे आज सकाळी १० वाजता खाजगी बसचा गंभीर अपघात झाला आहे. सुदैवाने रस्त्यालगत असलेल्या दाट झुडुपांमुळे मोठी दुर्घटना टळली, अन्यथा हा अपघात अनेक निष्पाप प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता.बस रस्त्यावरील नियंत्रण सुटल्याने घसरत थेट कडेला जाऊन एका बाजूला झुकली. झुडुपांचा आधार मिळाल्यामुळे बस खोल दरीत कोसळण्यापासून थांबली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.कालच याच परिसरात अपघाताची घटना घडलेली असताना,आज पुन्हा खाजगी बस चा अपघात घडला.