हदगाव: हदगावमध्ये ढगसदृश्य पाऊस. नदी नाल्यांना पूर नेरली गावामध्ये पूर परिस्थिती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Hadgaon, Nanded | Oct 30, 2025 नांदेडच्या हदगांव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान हदगाव तालुक्यातील नेवरी गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून पेनगंगा नदीकाठच्या जमिनी या पुरामुळे खरडून गेल्या आहेत तर काढून ठेवलेले सोयाबीन या पाण्यात वाहून गेलय. त्याचबरोबर कापसाचे देखील मोठे नुकसान झालेय हे पाणी लोकांच्या घरामध्ये जाऊन संसार उपयोगी साहित्याचे सुद्धा नुकसान झाले