जालना: चंद्रशेखर बावनकुळे वर अश्लील शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल,उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी उप.पो.कार्यालय माहिती
Jalna, Jalna | Aug 11, 2026 आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की काल दिनांक 10 ऑगस्ट रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी एकाच सोशल मीडिया युजर याचे नाव त्रिशूल पाटील असे असून त्याच्यावर विविध कलमांतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.