तुमसर: शहरातील दत्तात्रय नगर येथे गोमांस विक्री करणाऱ्या फरार आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर शहरातील दत्तात्रय नगर येथे दि. 17 सप्टेंबर रोज बुधवारला दुपारी एक वाजताच्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक न्याहालचंद बोरकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे फरार आरोपी इरफान अली हसन अली सय्यद याच्या घरातून प्लास्टिक पिशवीत ठेवलेले एकूण 35 किलो गोमांस, एक इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण 9 हजार 250 रुपयांचा मुद्देमात जप्त केला. यावेळी पोलीस आल्याचे लक्षात येताच आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी फरार आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.