जालना: तरुणीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून धर्मातरासाठी दबाव, संतप्त जमावाने लावली आरोपीच्या घराला आग
Jalna, Jalna | May 8, 2026 तरुणीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून धर्मातरासाठी दबाव,संतप्त जमावाने लावली आरोपीच्या घराला आग.. आज दिनांक 8 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील भोकरदन तालुक्यातील एका तरुणीवर नऊ वर्षे अत्याचार करून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच, संतप्त जमावाने आरोपीच्या घराला आग लावली. या घटनेमुळे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.प