नागपूर शहर: पॉश सोसायटीमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्यावर छापा : राहुल शिरे पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक, राहुल शिरे यांनी पाच मे ला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार 'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसा-पिपला रोडवरील माधनगरीत छापा टाकून देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पद्मिनी गुलशन बसू नामक महिलेला अटक करण्यात आली असून, एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी दिली आहे.