श्रीवर्धन: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बोर्ली पंचतन येथील श्री गणपती मंदिर सभागृहाचा लोकार्पण सोहळा
आज रविवारी दुपारी दुपारी १.३० च्या सुमारास रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील श्री गणपती मंदिर सभागृहाचा लोकार्पण सोहळा प्रसन्न वातावरणात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमाप्रसंगी गणेशभक्त, स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.