सेनगाव: आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत प्रहार पक्ष ताकतीनिशी उतरणार, जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे
प्रहार जनशक्ती पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत आज जाहीर झाले असून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात व आदेशाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये प्रहार आपले उमेदवार उतरविणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दिली.