कल्याण: कल्याण मधील स्कायवॉकवर दोन तरुणींमध्ये एकमेकींच्या झिंज्या ओढत तुफान राडा, व्हिडिओ व्हायरल
Kalyan, Thane | Oct 3, 2025 कल्याण मधील स्कायवॉकवर दोन तरुणींमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण मधील स्काय वॉक वर दोन तरुणींमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला आणि तेथेच एकमेकींचे केस ओढत एकमेकींना मारहाण करू लागल्या. त्यानंतर एक मुलगी आणि एका व्यक्तीने मध्यस्थी केले आणि वाद मिटवला. मात्र हा प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.