नागपूर शहर: नागपुरात ‘पार्टी ड्रग्ज’चा शिरकाव: दोन विद्यार्थी एलएसडीसह अटकेत : राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त
पोलीस उपयुक्त राहुल माकणीकर यांनी 25 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, जयताळा परिसरात केलेल्या कारवाईत दोन विद्यार्थ्यांना १७ एलएसडी डॉट्ससह अटक केली आहे. हे दोन्ही तरुण शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असून, मूळचे गोंदियाचे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपयांचे ड्रग्ज आणि वाहनांसह एकूण ४ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आणखी एक संशयित फरार असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.