लातूर: मांजरा धरणात पाण्याचा विसर्ग वाढला, नागरिकांनी खबरदारी घ्यावी प्रशासनाचे आवाहन,
Latur, Latur | Sep 16, 2025 मांजरा प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने मंगळवार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10.00 वाजता गेट क्रमांक 1, 3, 4 आणि 6 (एकूण 4 गेट) प्रत्येकी 0.25 मीटरने उचलून विसर्ग वाढविला आहे.सद्यस्थितीत धरणातून सांडव्याची दोन वक्रद्वारे (क्र. 2 व 5) 0.50 मीटरने तसेच चार वक्रद्वारे (क्र. 1, 3, 4 व 6) 0.75 मीटरने विसर्ग सुरू आहे. यामुळे मांजरा नदीपात्रामध्ये एकूण 13,166.40 क्युसेक्स (372.88 क्युमेक्स) इतका आहे