जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवकांमध्ये एचआयव्ही/एड्स विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अलिबाग येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारा कमानी परिसरातून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचे आयोजन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.