पनवेल: कळंबोलीत डॉक्टरच्या गाडीने तिघांना उडवले
Panvel, Raigad | Jun 17, 2026 कळंबोली वसातील मधील मुख्य रस्त्यावरून आपल्या इसयुई गाडीने हॉस्पिटलमध्ये जात असताना सत्यम हॉस्पिटलचे मालक संजय बरनवाल यांनी तिघांना उडवत गंभीर जखमी केले आणि सुसाट गाडी रस्त्यावरील फुटपाथ चढून एका दातांच्या डॉक्टरांच्या दवाखान्याला जाऊन धडकली. सदरचा प्रकार हा सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडल्याने प्रचंड मोठा जमाव जमला. तात्काळ कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी त्वरित आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.